जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करणे, पीक विमा मंजूर करावा, सातबारा उताऱ्यावर पीकाची नोंदी करावी, अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून मागणी केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यातील मंजूर पीकविमा वर्ग व्हायला उशीर होत आहे म्हणून व्याजासह पीकविमा देण्यात यावा, २०२४ मधील अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील ४० मंडळात सरासरीपेक्ष १५० टक्के पाऊस झाल्याने खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा. कापुस, सोयाबीन अनुदान ज्यांच्या उताऱ्यावर नोंद झाली नाही ती करून मिळावी कारण शेतकऱ्यांनी पीक पेरले होते, त्याचा पीकविमा घेतला होता. तर त्यांना कापुस, सोयाबीन अनुदान मिळाले पाहिजे, त्यात तलाठी लोकांची चूक आहे. ती त्यांनी दुरुस्त केली जाईल असे अश्वासन देण्यात आले. २०२१ खरीप हंगामात ८ सप्टेंबर आणि १८ ऑक्टोबर ह्या दिवशी अतिवृष्टी झाली, पण त्याचे अनुदान मिळाले नाही त्यावर पण कोणाची चूक? ,कुठे? चूक शोधली जाईल असे आश्वासन दिले. कलाली, दोधवद, हिंगोणे, निंभोरा येथील टाटा ईशा बियाण्या मध्ये फसगत झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला.

Protected Content