धनंजय चौधरी यांनी हिंगोणा परिसरातील गावकऱ्यांशी साधला संवाद

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात मिळणारा प्रतिसाद आणि गावातील अडी अडचणी समजून घेत कृतज्ञता संवाद यात्रा यशस्वी होत आहे. आपल्या माणसांमध्ये गेल्याशिवाय त्यांच्या समस्या समजणार नाहीत त्या समजून घेण्यासाठी आमदार शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक गावाला भेट देत आहे असे काँग्रेसचे  युवानेतृत्व धनंजय चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

धनंजय चौधरी यांची हंबर्डी व हिंगोणा या गावी कृतज्ञता संवाद यात्रेच्या माध्यमातुन ग्रामस्थांशी संवाद साधला. हंबर्डी गाव साधारण पंधराशे लोकांच्या वस्तीची असून गावात वैशिष्ट्यपूर्ण असे भगवान परशुराम रेणुका मातेचे मंदिर आहे. हजारोंच्या संख्येने भाविक या गावी नवरात्र उत्सवामध्ये येत असतात. सर्वप्रथम यावेळी माननीय धनंजयभाऊ यांनी रेणुका मातेच्या मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर सरपंच उषा पाटील,रुपेश महाजन व हंबर्डी ग्रामस्थ यांच्या हस्ते गावातील पाण्याच्या टाकीवरती जलपूजन करण्यात आले. तसेच गावाच्या जडणघडणेत महत्त्वाचे योगदान देऊन मयत झालेल्या व्यक्तींप्रती कृतज्ञता भाव म्हणून जिल्हा परिषद शाळा येथे वृक्षारोपण करण्यात आले. धनंजय चौधरी यांनी हंबर्डी गावात विविध ठिकाणी भेटी देऊन गावकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

आमदार शिरीष चौधरी यांनी हंबर्डी तालुका यावल या गावासाठी आमदार निधी मार्फत सिमेंट रस्ते,पेवर ब्लॉक व रस्ते डांबरीकरण,जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी,पाईपलाईन, मागासवर्गीय वस्ती समोर प्रवेशद्वाराचे बांधकाम, केसरबाई पोपटलाल बाविस्कर सार्वजनिक वाचनालय यासाठी पुस्तके ग्रंथ पुरवणे असे विविध विकास कामे पूर्ण केलेली आहेत अशी माहिती ग्रामस्थांची भेटी दरम्यान सरपंच उषा पाटील यांनी दिली. याप्रसंगी जलपूजन व वृक्षारोपणास हंबर्डी येथील रुपेश महाजन,सरपंच उषा पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले त्याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक व्ही.टी पाटील, रवी बेंडाळे,किशोर फालक, भरत नेमाडे, धुलचंद नेहेते,शशिकांत सावकार, गुलाम मन्यार,अजित मण्यार,डी.एन.तडवी आदी उपस्थित होते.

दुपारच्या सत्रात धनंजय चौधरी यांचा कै.मधुकरराव चौधरी यांचे विशेष प्रेम असलेल्या हिंगोणा या गावी कृतज्ञता दौरा केला. हिंगोणा गाव क्षेत्रफळाच्या दृष्टीने हिंगोणा गाव महाराष्ट्र राज्याच्या नकाशा मधील सर्वात मोठी ग्रामपंचायत व सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत असलेले गाव आहे. कै. मधुकरराव चौधरी यांच्या दूरदृष्टीकोनातून निर्माण झालेला मोर माध्यम प्रकल्प हा सुद्धा या गावाच्या अगदी जवळच आहे. मोर माध्यम प्रकल्पातील असलेल्या पाण्यामुळे व आजूबाजूच्या परिसरातील लोकांच्या जीवनमानात कमालीची स्थिरता निर्माण झालेली आहे.

प्रभात विद्यालय हिंगोणा या शाळेचे पुनरुज्जीवन सुद्धा कै. मधुकरराव चौधरी हे शिक्षणमंत्री असताना झालेले आहे.अशी माहिती गावातील नागरिक भूपेंद्र दिनकर झोपे यांनी भेटीदरम्यान दिली. आमदार शिरीष चौधरी यांनी हिंगोणे गावासाठी सिमेंट रस्ते, गटारी, आर आर सी बांधकाम, कब्रस्तान संरक्षण भिंत, बंधारे, साठवण बंधारा क्रमांक एक व दोन, गावाबाहेरील रस्त्यांचे डांबरीकरण जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी पाईपलाईन अशा मोठ्या स्वरूपाचे कामे पूर्ण केलेली आहेत.या गावी माननीय धनंजयभाऊ यांनी हाती घेतलेल्या जलपूजनाचे तसेच वृक्षारोपणाने सुरुवात झाली.

सर्वप्रथम हिंगोणा तालुका यावल या गावी जलपूजन गौरव महाजन,छगन गाजरे तसेच हिंगोणा ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी गावातील जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देऊन मयत झालेल्या लोकांप्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्या नावे एक झाड जिल्हा परिषद शाळा हिंगोणे येथे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती. याप्रसंगी जलपूजन व वृक्षारोपणास गौरव महाराज,छगन गाजरे,गोपाळ गाजरे यांच्या हस्ते जल पूजन करण्यात आले त्याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक राजेंद्र राणे,भूषण राणे,रंजीत पाटील,दिनकर जंगले, अरमान तडवी,बाळू फालक, हरी धनजी पाटील,अशपाक तडवी, याकुब खान,धनाजी चौधरी,रमेश बोंडे,दिलीप टेलर,भालचंद्र जंगले, सुभाष पाटील,प्रशांत बोंडे,शांताराम कोळी आदी उपस्थित होते..

Protected Content