रावेर-पाल रस्त्यावर अपघात: एकाचा जागीच मृत्यू

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर-पाल रस्त्यावर मोटर-सायकल टाटा मॅजिकचा मोठा अपघात होऊन त्यात एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या बाबत वृत्त असे की मयत आरसिंग रा झिरन्या जि खरगोन रोजगाराच्या शोधात महाराष्ट्र आला होता. पाल- रावेर रस्त्यावर त्याची मोटरसायकल व टाटा मॅजिकचा अपघात झाला यात आरसींग जागेच ठार झाला. त्याच्या पश्चात दोन मुले दोन मुली पत्नी असा परिवार आहे. त्याच्या मृत्युने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Protected Content