Home Cities मुक्ताईनगर नितीन कांडेलकरांच्या ठिय्या आंदोलनाला ऑल इंडिया पॅथर सेनेचा जाहीर पाठिंबा

नितीन कांडेलकरांच्या ठिय्या आंदोलनाला ऑल इंडिया पॅथर सेनेचा जाहीर पाठिंबा

0
45

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या 13 दिवसांपासून मुक्ताईनगर तहसील कार्यालय येथे नितीन कांडेलकर हे आदिवासी कोळी जमातीच्या न्याय हक्कासाठी बिर्हाड मोर्चा ठिय्या आंदोलनाला बसले आहे आदिवासी कोळी जमातीचे टोकरेकोळी एस टी चे प्रमाण पत्र मिळावे म्हणून, उपोषणाला ऑल इंडिया पँथर सेनेतर्फे भेट देण्यात आली व जाहीर पाठिंबा देण्यात आला प्रशासनाला मागणी करण्यात आली.

त्या वेळेस उपस्थित कार्यकर्ते जिल्हा अध्यक्ष लखन पानपाटील, उपाजिल्हा अध्यक्ष रोहन मेढे, जिल्हा संघटक बंटी गुरचळ, तालुका अध्यक्ष अमर येमनेरे, उपाध्यक्ष संघपाल कोंघे, युवा तालुका अध्यक्ष सम्राट बोदडे, तालुका संघटक राहुल वानखेडे, तालुका सचिव आकाश रायपुरे, प्रसंनंजित वानखेडे, प्रमोद वानखेडे.बोदवड तालुकाध्यक्ष संदीप सुरवाडे, कोळी राष्ट्रसंघ जळगाव जिल्हा उपाध्यक्ष गजानन कांडेले, कोळी राष्ट्रसंघ युवा नेते दिपक तायडे व ऑल इंडिया पॅंथर सेनेचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थितीत होते.


Protected Content

Play sound