भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील गोंभी येथील माहेर असलेल्या विवाहितेला पाचोरा तालुक्यातील माहेजी नांद्रा येथे २ लाख रुपयांची मागणी करत मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पतीसह सासरच्या मंडळीविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील गोंभी येथील बाहेर असलेल्या ज्योती उमेश पाटील (वय-३४) यांचा विवाह पाचोरा तालुक्यातील माहिती नांद्रा येथील उमेश जगन्नाथ पाटील यांच्याशी रीतीरीवाजानुसार झालेला आहे. दरम्यान प्लॉट घेण्यासाठी बाहेरून २ लाख रुपये आणावे, अशी मागणी पती उमेश पाटील यांनी विवाहितेकडे केले. दरम्यान पैसे आणू नये या रागातून तिला शिवीगाळ करत मारहाण करून छळ केला. तसेच सासू – सासरे, ननंद, भाचा, मामसासरे यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला. दरम्यान हा छळ सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या.
यानंतर विवाहितेने शनिवारी १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव तक्रार दिली. त्यानुसार पती उमेश जगन्नाथ पाटील, सासरे जगन्नाथ मयाराम पाटील, सासू दुर्गाबाई जगन्नाथ पाटील, ननंद रत्नाबाई सुनील पाटील, भाचा महेश सुनील पाटील सर्व रा. नांद्रा ता. पाचोरा, मामसासरे रविंद्र पोपट पाटील रा. बांबरुड ता. पाचोरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत मिटकरी हे करीत आहे