यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील व्यास शिक्षण मडळ यावल व्दारे संचलित जे टी महाजन इंग्लिश स्कूल येथे दिनांक १३ सप्टेंबर रोजी आजी-आजोबा दिवस साजरा करण्यात आला त्या प्रसंगी कार्यक्रमाने अध्यक्षस्थान शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन यांनी स्वीकारले तसे इंग्रजी माध्यम चे प्राचार्य,ज्ञानेश्वर मावळे यांनी देखील उपस्थिती दिली, तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री लोखंडे व गौरी भिरुड यांनी सुदधा आपली उपस्थिती दर्शवली.
सर्व प्रथम सरस्वती पूजन व दिप प्रज्वलन हे अध्यक्ष व आजी-आजोबा यांच्या हस्ते करू करून कार्यक्रमात्ती सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित आजी- आजोबा स्वागत रुमाल व पुष्पगुच्छ व देवून करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी काही चिमुकल्यांनी आजी-आजोबा यांच्याबद्दल असलेले प्रेम व आपुलकी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी संध्या उद्भवलेल्या सत्य परिस्थिती म्हणजेच वृद्धाश्रम या विषयावर एक नाटक व डान्स सादर केला. या नाटकाने आजी-आजोबा याचे डोळे पाणावले व ते भावुक झाले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुद्धा डान्स सादर केला. त्यानंतर आजी आजोबा यांनी देखिल कार्यक्रमा बद्द्ल व शाळेबद्दल कौतुक करत त्यांचे मत व्यक्त केले शाळेच्या शिक्षिका श्रीमती लोखंडे मॅडम यांनी आजी-आजोबा यांच्या बद्दल भावना व्यक्त केल्या.अध्यक्षीय भाषणात सौ रंजना महाजन यांनी आजी-आजोबा शी संवाद साधत आपले विचार व्यक्त केले त्यानंतर आजी – आजोबा यांच्यासाठी संगीत खुर्ची हा कार्यक्रम आयोजित करून त्यात आजी-आजोबांनी सहभाग घेतला. कार्यक्रमात सञसंचान श्रध्दा बडगुजर माहिती श्रीमती राजश्री लोखंडे मॅम आभार प्रदर्शन वंदना चोपडे मॅम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वितेकरता पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे मॅम व सौः गोरी भिरूड व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहकार्य लाभून कार्यक्रम आनंदात पार पडला.