गणेशोत्सवात डॉ केतकी पाटलांकडून दिला जातोय सामाजिक संदेश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विद्येची देवता गणपती बाप्पाचा उत्सव सर्वत्र आनंदाच्या वातावरणात साजरा केला जात असून यावल, रावेर तालुक्यासह विविध ठिकाणाहून महाआरती करण्याचा मान भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकी ताई पाटील यांना दिला जात आहे. त्यादेखील सहभागी होऊन लहान गणेश भक्‍तांना नियमित अभ्यास करा, मोबाईलचा अती वापर टाळा यासारखे सामाजिक संदेश देत आहे.

गणेशोत्सवात यावल, रावेर, मुक्‍ताईनगर, नांदूरा, भुसावळ, जळगाव यासह विविध तालुक्यातील सार्वजनिक गणपती मंडळाद्वारे डॉ केतकी पाटील यांना महाआरती करण्यासाठी आग्रहाचे आमंत्रण दिले जात आहे. त्या देखील आमंत्रण स्विकारत आरतीप्रसंगीच नव्हे तर केवळ मंडळाला सदिच्छा भेट देण्यासाठी त्या जात आहे. दरम्यान परिसरातील गणेश भक्‍त महिला, पुरुष, तरुणाई, वृद्ध यांच्यासह बालगोपाळ देखील मोठ्या संख्येने उपस्थीत असतात.

याप्रसंगी उपस्थीत बालकांना सोबत घेऊन डॉ केतकी पाटील ह्या आरती करतांना अनेक ठिकाणी दिसून येत आहे. हल्‍ली लहान मुलांमध्ये मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढले आहे, मोबाईल न दिल्यास त्यांची चिडचिड होते आणि परिणामी पालक त्रस्त होतात. ही समस्या ओळखून डॉ केतकी पाटील ह्या मुलांकडून मोबाईल जास्त वापरल्याने कसे नुकसान होते, हे पटवून देत आहे. तसेच गणपती बाप्पाच्या साक्षीने आम्ही नियमित अभ्यास करु, मोबाईल खेळणार नाही असा संकल्पही त्या करुन घेत आहे. यामुळे गणेशोत्सवातील आनंद द्विगुणीत होत आहे.

डॉ केतकी ताईंच्या साध्या, सरळ स्वभावाची चर्चा
गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांची लेक म्हणून डॉ केतकीताई पाटील यांची ओळख मतदार संघात आहे परंतु त्या आपल्या साध्या सरळ स्वभावाने समोरच्या आपलेसे करुन घेतात. यामुळे उपस्थीतांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा रंगत आहे.

Protected Content