Home क्राईम त्रिपुरा येथे दहशतवाद्यांशी सामना करताना चोपड्यातील जवानाला वीरमरण

त्रिपुरा येथे दहशतवाद्यांशी सामना करताना चोपड्यातील जवानाला वीरमरण

0
30


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चोपडा येथील जवान अरूण दिलीप बडगूजर यांना त्रिपुरा येथे सोमवारी दुपारच्या सुमारास अतिरेक्याशी लढतांना हौतात्म्य आले. गेल्या २० वर्षांपासून ते १०५ बीएसएफ बटालियन (सी टी /जीडी)मध्ये कार्यरत होते. ते चार महिन्यांनी निवृत्त होणार होते.

भारत-बांग्लादेश सीमेवर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते शहीद झाले, अशी माहिती चोपड्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली. या घटनेबाबत अरूण बडगुजर यांच्या घरी निरोप आला होता. घटना समजल्यानंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.


Protected Content

Play sound