व्यापाऱ्याची बॅग लिप्टींग करणाऱ्या तिघांचा सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले

जळगाव-लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । गुजरात येथील व्यापारी भुसावळ येथे व्यापार करण्यासाठी जात असताना जळगाव येथील दादावाडी येथील जैन मंदीराजवळ अज्ञात तीन जणांनी कारमधील १ लाख २० हजाराची बॅग घेऊन पसार झाल्याची घटना सोमवारी ९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता घडली होती. जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून दोन तासांमध्ये तिघांना अटक करण्यात आले असून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सायंकाळी ५ वाजता दिली.

याबबात अधिक माहिती अशी की, सुरत येथील व्यापारी हिराभाई किरीटभाई रावल हे भुसावळ या ठिकाणी हुंडाई गाडी क्रमांक ( जीजे ०१ आर एल ८१८८) ने जात होते. जळगाव येथील दादावाडी जैन मंदीराजवळ असलेल्या आयडीबीआय बँकच्या एटीएम समोर थांबलेले होते. तेवढ्यात ३ जण दुचाकीवर आले. त्यातील एकाला चक्कर आल्याचे नाटक त्यांनी केले. त्यावेळेस दुसऱ्याने कारमध्ये असलेली बॅग ज्यामध्ये १ लाख २० हजार रुपये होते ती घेऊन भुसावळच्या दिशेने पसार झाला.

दरम्यान त्यांचे लोकेशन शोधून वाहन चालक महेश सूर्यवंशी यांनी अति वेगाने वाहन चालून त्यांना भुसावळ येथे शेतात पळून जात असताना पाठलाग केला. एलसीबीच्या टीम पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, सहाय्यक खासदार अतुल वंजारी, पोहे हिरालाल पाटील, राजेश मेढे, चिन्मय पाटील यांनी संशयित आरोपी जितेंद्र रामलाल चव्हाण (वय ३२, रा. टाहकळी ता. मुक्ताईनगर), राजेंद्र मधुकर जाधव (वय ३१), बंडू जेता राठोड (वय २८, मुराझिरा, मुक्ताईनगर) या तिघांना बोदवड रस्त्यावरील मोंढाळे गावाजवळ अटक केली. त्यांच्याकडून दोन दुचाकी व १ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

Protected Content