पहूरकरांनी ठोकले महावितरणाच्या ऑफिसला कुलूप

पहूर, ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वेळोवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने पहूर परिसरातील शेतकऱ्यांनी अनोख्या पध्दतीने आंदोलन केले. पहूर व त्याच्या आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरण ऑफिसला कुलूप ठोकले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोंदेगाव फिडर वरील लाईन वेळोवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने संतप्त झालेल्या पहूर शेरी, लॉन्ड्री व परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पहूर पेठ येथील महावितरण ऑफिसला कुलूप ठोकले. याबाबत गोंदेगाव फिडर वरील वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी हिंगोले यांचे मंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर सुद्धा हिंगोले यांनी या वीज पुरवठ्यासंदर्भात व सतत होणारा खंडित वीजपुरवठाकडे दुर्लक्ष केल्याने शेवटी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आज ९ सप्टेंबर रोजी पहूर येथील महावितरण ऑफिसला कुलूप ठोकल्यानंतर व हिंगोले त्या ठिकाणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी निवेदन दिले.

यावेळी पहूर पेठ ग्रामपंचायत सदस्य बंडू अशोक पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य शरद वैजनाथ पांढरे, चरण पाटील, अमोल पाटील, अमोल पांढरे यांच्यासह पहूरसह शेरी, लॉन्ड्री येथील असंख्य शेतकरी यावेळी उपस्थित होते.

Protected Content