XYZ माणसाबद्दल मी काही बोलत नाही; एकनाथ खडसेबाबत बोलताना पंकजा मुडेंची प्रतिक्रिया

अहमदनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंकजा मुंडे यांच्या हस्ते राहता येथील पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांना एकनाथ खडसे यांच्या बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी XYZ माणसाबद्दल मी काही बोलत नाही. अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे. एकनाथ खडसे काय म्हणाले, याबद्दल मी काय बोलणार? आणि कोणी म्हटले म्हणून मी त्यावर टिप्पणी करत नाही. मी माझ्या भूमिकेवर राजकारण करते. काय काम झाले पाहिजे? हे मी बघत असते, असे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले जात आहे. याबाबत देखील पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला होता. दोन पक्ष हे वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण करत असतात. विरोधी पक्ष आमचा हार घालून सत्कार करतील, असे आम्हाला अपेक्षा नसते. आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे प्रमुख नेत्यांना साहजिकच टार्गेट केले जाईल. मात्र आमचे प्रमुख नेते त्यांचे काम करत असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

Protected Content