राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका घेण्याचे धाडस सरकारमध्ये नाही – जयंत पाटील

सांगली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका घेण्याचे धाडस सरकार दाखवत नाही. त्यातच त्यांनी विधानसभा निवडणुकाही पुढे ढकलल्या आहेत. मालवणमध्ये घडलेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केल्यास जनता खपवून घेणार नाही, असा टोला आमदार जयंत पाटील यांनी सरकारला लगावला.

वाळवा तालुक्यातील ढगेवाडी येथील नूतन ग्राम सचिवालय आणि इतर विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, आमदार मानसिंगराव नाईक, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सरपंच संदीप सावंत यांनी स्वागत केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, नेर्लेचे सरपंच संजय पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, तालुका कार्याध्यक्ष देवराज देशमुख, संचालक रामराव पाटील, दीपक पाटील, अमरसिंह साळुंखे, ढगेवाडीचे सरपंच संदीप सावंत, बँकेचे माजी संचालक शहाजी गायकवाड, कार्वेचे सरपंच शहाजी पाटील, ऐतवडे बुद्रुकचे सरपंच सुभाष कुंभार, जक्राईवाडीचे सरपंच दिग्विजय माने, देवर्डेचे सरपंच अनंत पाटील, उपसरपंच स्रेहल माने उपस्थित होते. वैभव माने यांनी आभार मानले.

Protected Content