आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचे निषेध आंदोलन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिक्षक दिनानिमित्ताने राज्यातील अबॅकस या राज्य पातळीवरील शासनमान्य आदिवासी विभाग कर्मचारी संघटना (शासकीय आश्रम शाळा) यावलचे प्रकल्प अध्यक्ष प्रशांत बोदवडे याच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात आपल्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी संपूर्ण राज्यातील शिक्षकांनी शासनाचा निषेध म्हणुन काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले.

या राज्य पातळीवरील आंदोलनात जळगाव जिल्ह्यातील १७ शासकिय शाळा व ३३ अनुदानित शाळा आणि ३ कार्यशाळा ठिकाणी आश्रमशाळेच्या वेळात बदल करून ११ ते ५ करणे व सरसकट जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील विविध आश्रम शाळेत शिक्षकांनी काळया फीती लाऊन शासनाच्या निषेध करण्यात आला. जळगाव येथे प्रशिक्षण स्थळी पी.बी. बोदवडे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. अबॅकस कार्यशाळा सोनबर्डी येथे कार्यअध्यक्ष नितिन गवारे, उपाध्यक्ष मनोज कार्यशाळेस पी.बी. पाटिल, कल्पना पाटिल, विष्णापुर आयोजित अबॅकस कार्यशाळा येथे संघटना उपाध्यक्ष एच डी पाटिल, दस्तगीर तड़वी यानी मार्गदर्शन केले.

वैजापुर शाळा- महिला अध्यक्ष शबाना तड़वी, पळसखेड़ा शाळा-दीपक लेंडाळे. मालोद -उगले सर,कृष्णापूर्- दीपक नांदुरे सर, सघटना सदस्य यानी आंदोलन यशस्वी होण्यासाठी मेहनत सहकार्य केले. सर्व जिल्हा निषेध आंदोलन यशस्वी झाले.तसेच वेळ बदल न झाल्यास २३ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Protected Content