पर्यावरणप्रेमी ग्रेटा थनबर्ग यांना अटक

कोपेनहेगन-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | स्वीडनमधील प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी ग्रेटा थनबर्गला पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भातला व्हिडीओ ग्रेटा थनबर्गने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओसह कोपनहेगनमध्ये नेमकं काय घडले, यासंदर्भात माहितीही देण्यात आली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ग्रेटा थनबर्गच्या समर्थनार्थ डेन्मार्कच्या पोलिसांना लक्ष्य करणाऱ्या हजारो प्रतिक्रिया व्हिडीओच्या पोस्टवर नेटिझन्सकडून केल्या जात आहेत.

बुधवारी डेन्मार्कच्या कोपनहेगनमध्ये ग्रेटा थनबर्ग व इतर काही विद्यार्थी आंदोलन करत होते. गेल्या वर्षी ७ ऑगस्ट रोजी हमासनं इस्रायलच्या भूमीवर हल्ला केला. त्याविरोधात इस्रायलनं गाझा पट्टी व वेस्ट बँक भागात जोरदार हल्ल चढवला. अजूनही इस्रायलकडून सातत्याने या भागात बॉम्ब हल्ले व जमिनीवरील कारवाया केल्या जात आहेत. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी ग्रेटा थनबर्ग व इतर काही विद्यार्थी युनिव्हर्सिटी ऑफ कोपनहेगनमध्ये निषेध आंदोलन करत होते. यावेळी घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ ग्रेटा थनबर्गने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

इस्रायलकडून सातत्याने पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टी व वेस्ट बँक या भागात हल्ले केले जात आहेत. मात्र, तरीदेखील कोपनहेगन विद्यापीठाकडून इस्रायलमधील विद्यापीठांशी संलग्न कार्यक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षपणे इस्रायलकडून करण्यात येत असलेल्या मानवसंहारातच सहभाग होत आहे. या पार्श्वभूमीवर कोपनहेगन विद्यापीठाने हे संलग्न कार्यक्रम बंद करावेत, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. त्याचवेळी, इस्रायलच्या कारवायांचा जागतिक स्तरावर निषेध व्हायला हवा, अशीही मागणी आंदोलकांनी केली आहे.

Protected Content