भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील नहाटा चौक येथे ३ लाखांच्या नोटा चालनात आणण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी बुधवारी ४ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ३ लाखांच्या नकली नोटा व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आले असून रात्री ११.३० वाजता तिघांवर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील नहाटा चौकात तीन जण दुचाकीवर येवून ३ लाखांच्या नकली नोटा चलनात आणण्याच्या उद्देशाने येत असल्याची गोपनिय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीसांना मिळाली. त्यानुसार बुधवारी ४ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता संशयित आरोपी सैय्यद मुशाईद अली मुमताज अली वय ३८ रा. उस्मानिया पार्क, जळगाव नदीम खान रहीन खान वय ३५ रा. सुभाष चौक, जळगाव हे दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीडी ५४०३) ने भुसावळ शहरातील नहाटा चौकात आलेले होते. त्यावेळी त्यांनी सोबत तीन लाख रूपयांच्या नकली नोटा होत्या. ह्या नोटा चलनात आणण्यासाठी संशयित आरोपी अब्दुल हमीद अब्दुल कागल रा. रसलपूर रोड, रावेर याच्याकडे देत असतांना पोलीसांनी छापा टाकत तिघांना पकडले. त्यांच्याकडून ३ लाख रूपये किंमतीच्या नकली नोटा आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सैय्यद मुशाईद अली मुमताज अली वय ३८ रा. उस्मानिया पार्क, जळगाव, नदीम खान रहीन खान वय ३५ रा. सुभाष चौक, जळगाव आणि अब्दुल हमीद अब्दुल कागल रा. रसलपूर रोड, रावेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे हे करीत आहे.