सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांची सलामी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दादावाडी येथील श्रीराम नगरातून सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकांचे बंद घराचे कडी कोयंडा तोडून घरातून गॅससिलेंडर चोरून नेल्याची घटना शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी २ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील दादावाडी परिसरातील श्रीराम नगरात तुकाराम नामदेव गांधिले वय-६३ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते पोलीस दलातून पोलीस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले आहे. दरम्यान ३० ऑगस्ट रोजी रात्री ८ ते ३१ ऑगस्ट सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान त्यांच्या घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत गॅस सिलेंडर चोरून नेलेचे समोर आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर या संदर्भात सोमवारी २ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ गुलाब माळी हे करीत आहे.

Protected Content