नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी २ ऑगस्ट रोजी आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाच्या देशव्यापी सदस्यत्व मोहिमेचा शुभारंभ केला आणि स्वत: प्रथम सदस्य म्हणून नावनोंदणी केली. नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि अमित शहा यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. भाजपची नवीनतम सदस्यता मोहीम पक्षाच्या घटनात्मक आवश्यकतांनुसार नवीन सदस्यांची नोंदणी करताना विद्यमान पक्ष सदस्यांच्या सदस्यत्वाचे नूतनीकरण करण्याच्या धोरणात्मक प्रयत्नांचा एक भाग आहे. या उपक्रमामुळे आगामी निवडणुकांसाठी पक्षाच्या तळागाळातील पाठिंब्याला लक्षणीय बळ मिळेल अशी अपेक्षा पक्षाध्यक्षांनी व्यक्त केली आहे.
भारतीय जनता पक्ष सदस्य नोंदणी कार्यक्रमादरम्यान, जेपी नड्डा आणि अमित शहा या दोघांनीही दृढ विश्वास व्यक्त केला की, पक्ष या मोहिमेद्वारे १० कोटी सदस्यांचा टप्पा ओलांडेल. या नोंदणीस सन २०१४ मध्ये मिळालेल्या यशाप्रमाणेच आताही यश मिळेल. पक्षाचा पाया विस्तारण्यासाठी आणि पक्षाची जनतेप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करण्यासाठी संघटना मोठ्या प्रमाणावर यश संपादन करेन. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी सदस्यत्व मोहिमेच्या महत्त्वावर भर दिला आणि ते केवळ आकड्यांच्या खेळाऐवजी वैचारिक आणि भावनिक चळवळ म्हणून वर्णन केले. “सदास्यता अभियाना’ची दुसरी फेरी आजपासून सुरू होत आहे. भारतीय जनसंघापासून आतापर्यंत आम्ही देशात नवीन राजकीय संस्कृती आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत,” अशी टिप्पणी पंतप्रधान मोदी यांनी केली.