बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपल्या मूळगावी सावळा येथे ग्रामस्थांसोबत बैलपोळा सण साजरा केला. पोळ्यानिमित्त बैलांना सजवून तुपकरांनी त्यांचे पूजन केले. भर पावसात सावळा गावी पोळा साजरा करण्यात आला.
ग्रामीण भागात पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, आज जरी बैलांची संख्या कमी होत असली तरी तुपकरांच्या सावळा गावी मात्र शेतकऱ्यांनी बैलजोड्या जपल्या आहेत. दरवर्षी रविकांत तुपकर हे त्यांच्या मूळ गावी पोळा साजरा करतात. गावकऱ्यांना भेटतात त्यांची आस्थेने चौकशी करतात, यावर्षीही त्यांनी आपल्या सावळा गावी पोळा साजरा करून शेतकऱ्यांना पोळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या.