पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील सार्वे येथे एका जवानाचा वीजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. याबाबत पाचोरा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजेंद्र शांताराम पाटील (वय ५०, रा. सार्वे ता. पाचोरा) असे मयत जवानाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्र पाटील हे आपला भाऊ, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी यांच्यासह राहत होते. राजेंद्र पाटील हे भारतीय सैन्य दलात सैनिक आहेत. सोमवारी २ सप्टेंब रोजी सकाळी ११ वाजता गावात असताना अचानक वीज गेली होती. त्यानंतर विज उतरलेल्या वायरला धक्का लागल्याने ते दुर फेकले गेले. त्यांना पाचोरा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. प्रसंगी नगरदेवळा दूरक्षेत्र पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली. पाचोरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.