गडचिरोली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी केली आहे, त्यांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार आहे. या महिलांना दोन्ही महिन्यांची रक्कम एकत्रित मिळणार आहे. मात्र ही ३१ ऑगस्टनंतर नोंदणी करणाऱ्या महिलांना तीन हजार रुपयांच्या लाभाला मुकावे लागणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्या गडचिरोली येथे बोलत होत्या.
अदिती तटकरे म्हणाल्या,एक सप्टेंबरनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून लाभ मिळणार आहे. ३१ ऑगस्ट ही नोंदणीची शेवटची तरखी नसून नाव नोंदणी या पुढेही कायम राहणार आहे.