आठ वर्षाच्या चिमुकलीला शाळेत अज्ञात व्यक्तीकडून मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील चिंचोली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ८ वर्षांच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता समोर आले आहे. याप्रकरणी रविवारी १ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे दिपाली विनोद पाटील वय २७ या महिला वास्तव्याला आहे. त्यांची मुलगी गायत्री पाटील वय ८ वर्ष ही चिंचोली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकायला जाते. दरम्यान ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास गायत्री ही शाळेच्या मधल्या सुट्टीनंतर जेवनाचा डबा ठेवण्यासाठी वर्गात गेली असता त्याठिकणी एका अज्ञात व्यक्तीने तिचे डोळे दाबले व तिला बेंचच्या खाली पाडून जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार पिडीत मुलीने घरी आईला सांगितला. त्यानुसार दिपाली पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रविवारी १ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे हे करीत आहे.

Protected Content