Home Cities रावेर व्हाँइस ऑफ मीडियाच्या अधिवेशनात मिलिंद टोके यांचा सन्मान

व्हाँइस ऑफ मीडियाच्या अधिवेशनात मिलिंद टोके यांचा सन्मान

0
66


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे अधिवेशन ३१ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर रोजी शिर्डी येथे उत्साहात संपन्न झाले. राज्यातील ३० पैकी ५ जिल्हाध्यक्षांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष मिलिंद टोके यांचा माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुरस्कार देऊन सम्मानीत करण्यात आले.

या कार्यक्रमावेळी मंचावर ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक प्रकाश पोहरे, पुढारी न्युज चैनलचे न्यूज एडिटर प्रसन्न जोशी, व्हॉइस ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सचिव दिव्या भोसले, शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, माजी खासदार हेमंत पाटील या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


Protected Content

Play sound