जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कामावरून घरी जात असतांना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एका प्रौढ व्यक्तीची जागीची मृत्यू झाल्याची घटना रविवारी १ सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संजय दिनकर कोळी वय ५१ रा. ममुराबाद रोड, सुनंदिनी नगर, जळगाव असे मयत प्रौढाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सुनंदिनी नगरात संजय कोळी हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होते. वेल्डिंग दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता ते वेल्डिंगचे दुकान बंद घर तरून घराकडे निघाले होते. दरम्यान, जळगाव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे खंबा क्रमांक ४२१ जवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुसऱ्या दिवशी रविवारी १ सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीला आले. त्यांच्या खिश्यातील कागदपत्राच्या आधारे त्यांची ओळख पटली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव रेल्वे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याबाबत जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.