अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी-तालुक्यातील कंडारी येथील बारावीत शिकणाऱ्या १८ वर्षीय युवकाचा धार येथील पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तो आपल्या मित्रांसोबत तलावात पोहण्यासाठी गेला होता अशी चर्चा परिसरात होती.
ही घटना आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.जयेश देसले असे मृत झालेल्या युवकाचे नाव असून; तो मारवड येथील भालेराव पाटील कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. जयेश आज दुपारी मित्रांसमवेत पोहायला गेला. यातील दोन विद्यार्थी थोडक्यात बचावले असून,जयेश मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तेथेच बुडाला.सायंकाळी उशिरापर्यंत मारवड पोलीस व स्थानिक गावकऱ्यांना त्यांचा शोध घेण्यास यश आले.
दरम्यान जयेश देसले याच्या मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे.