दवाखान्याची फी मागितल्याच्या कारणावरून डॉक्टरला बेदम मारहाण; मारेकरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वैद्यकीय तपासणीची फी मागितल्याच्या कारणावरून चार जणांनी दारूच्या नशेत येवून आयोध्या नगरातील डॉक्टराला लाथाबुक्क्यांसह फायटर व लोखंडी पाईपाने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता घडली आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी बुधवारी २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, डॉ. योगेश कैलासनाथ बसेर वय ४५ रा. भिकमचंद जैन, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे जळगाव शहरातील अयोध्या नगरात दावाखाना आहे. वैद्यकीय व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे २७ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता हे अयोध्या नगरातील दवाखान्यात असतांना त्या ठिकाणी बाब्या यादव, गोलू जोनवाल, सुबोध कोळी व हर्षल (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. अयोध्या नगर, जळगाव हे दारूच्या नशेत आले. त्यावेळी डॉक्टर योगेश बसेर यांनी दवाखान्याची फी मागितली. याचा राग आल्याने चौघांनी शिवीगाळ करत फायटर, लोखंडी पाईप आणि चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. या मारहाणीत डॉक्टर बसेर याचे नाक फ्रॅक्चर केले तर डोक्याला व डाव्या पायाला गंभीर दुखापत केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी बुधवारी २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content