२२ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा न्यूयॉर्कमध्ये कार्यक्रम

न्यूयॉर्क-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ स्टेडियममध्ये ‘मोदी आणि यूएस प्रोग्रेस टुगेदर’ कार्यक्रमाला संबोधित करतील. त्यांच्या अमेरिका दौऱ्याबद्दल भरवंशीयांमध्ये उत्साह आहे. आतापर्यंत २४ हजार भारतीयांनी पीएम मोदींना ऐकण्यासाठी नोंदणी केली आहे, तर स्टेडियमची क्षमता १५ हजार आहे. इंडो अमेरिकन कम्युनिटी ऑफ यूएस या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. आयएसीयू नुसार नोंदणी करणाऱ्या भारतीयांची संख्या ३० हजारांच्या पुढे जाऊ शकते.

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमेरिकेतील ५० पैकी ४२ राज्यांमधून भारतीय येण्याची शक्यता आहे.सर्वाधिक नोंदणी न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कनेक्टिकट, टेक्सास, फ्लोरिडा येथून झाली आहे. ५९० भारतीय अमेरिकन समुदाय संघटना पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यग्र आहेत. यामध्ये भारतीय-अमेरिकन लोकांच्या धार्मिक आणि भाषिक संघटनांचा समावेश आहे. पीएम मोदींच्या या कार्यक्रमात विज्ञान, मनोरंजन आणि व्यवसाय क्षेत्राशी निगडीत यशस्वी भारतीय देखील सहभागी होतील.

Protected Content