पुतळा कोसळल्याच्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फ़े निषेध

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवणजवळील राजकोट किल्ल्यावरील आठ महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण केलेला नौदला मार्फत उभारणी करण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा 26 ऑगस्ट रोजी अचानक कोसळला. या घटनेने छत्रपती शिवरायांचा अवमान झाला असून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सदोष बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार आणि या घटनेला जबाबदार असणाऱ्या इतर व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी तहसीलदार यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटिल, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, उबाठा गटाचे मनोहर खैरनार, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, माजी सभापती निवृत्ती पाटिल, दिलीप पाटिल, विलास धायडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन राजे पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र माळी, लताताई सावकारे, भागवत पाटील, प्रेमचंद बढे, अनिल पाटील, प्रविण पाटील, बापु ससाणे, संजय कोळी, साहेबराव पाटिल, सोनु पाटील, प्रविण दामोदरे, विनोद काटे, नंदकिशोर हिरोळे, योगेश काळे, राहुल पाटील, निलेश भालेराव, भुषण पाटील, रउफ खान, अज्जू खान, सय्यद फिरोज, जितेंद्र पाटिल, सुभाष खाटीक, रफिक मिस्त्री, हरिभाऊ कवळे, भैय्या पाटिल, बाळा चिंचोले, अजय अढायके व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले

Protected Content