जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील महावीर नगरात महिलेचे बंद घरफोडून घरातून २५ हजारांची रोकड आणि चांदीचे शिक्के असा एकुण २८ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवार २८ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
याबाबत अधिक माहिती अशी की, संगिता महेश ओझा वय -५० रा. दूध फेडरेशन, महाविर नगर, जळगाव ही महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १० ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेपासून त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून घरातून २५ हजारांची रोकड आणि ३ हजार रूपये किंमतीचे चांदीचे शिक्के असा एकुण २८ हजार रूपयांचे ऐवज नेला. ही घटना बुधवार २८ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता समोर आली. त्यानंतर महिलेने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुपारी २ वाजता पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ योगेश पाटील हे करीत आहे.