मनाने श्रीमंत व कष्टाळू भगिनीकडे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराजांनी केले भोजन

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फैजपूर येथील सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार प. पू. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन चार दिवसापूर्वीच जाहीर केले. काठमांडू नेपाळ येथे झालेल्या दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदय द्रावक घटनेमुळे त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे निश्चित केले होते. तर त्यांनी सकाळी ११-०० वाजता विद्यानगर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळील रहिवासी उषाबाई प्रल्हाद गलवाडे या गरीब, सात्विक वृत्तीच्या धार्मिक असलेल्या सामान्य कष्टाळू शेतमजूर भगिनीकडे भोजन करून आपला वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा केल्याचे सांगितले. यावेळी उषाबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, माझे आयुष्य धन्य झाले. गेल्या तीन दिवसापासून मला श्री स्वामी समर्थांचे दर्शन होत होते. मात्र प्रत्यक्षात माझ्याकडे परमपूज्य जनार्दन महाराजांच्या रूपाने माझ्या छोट्याशा घरात स्वामी समर्थच आले याचा मला आत्या आनंद झाला आहे. माझ्या आयुष्य धन्य झाले. माझ्या आयुष्यभरातील भक्ती व श्रद्धेला फळ मिळाले. काय बोलावे मला सुचत नाहीये. आनंद अश्रूंना वाट मोकळी करून शबरीच्या मोडक्या झोपडीत आज राम आले अशी भावना उषाबाई गलवाडे यांनी व्यक्त केली.

सतपंथ मंदिरामध्ये महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांचे हार, पुष्पगुच्छ स्वतः न स्वीकारता भगवंताजवळ तेवत ठेवलेल्या ज्योतीला नमस्कार करून नेपाळ येथील दुर्दैवी अपघातात मयत झालेल्या सर्व भाविकांना विनम्र श्रद्धांजली वाहण्याची विनंती महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी केली. त्या अनुषंगाने दिवसभर सर्व भाविकांनी आपले पुष्पगुच्छ, हार मयत भाविक भक्तांच्या सद्गतीसाठी भगवंताला अर्पण करून भक्ती भावाने विनम्र श्रद्धांजली वाहून महाराजांचे शुभाशीर्वाद घेतले. परमपूज्य महाराजांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन करूनही सकाळपासून चाहत्यांनी गर्दी केली. यावेळी अनेक राज्यातील धर्मगुरू, संत महंत, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह अनेकांच्या शुभेच्छा महाराजांनी फोनवरच स्वीकारल्या.

Protected Content