नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी झारखंड विधानसभा निवडणूक भाजप आणि ऑल झारखंड स्टुडंट्स यूनियन एकत्र (आजसू) लढणार आहेत. आजसू प्रमुख सुदेश महतो यांनी आज २६ ऑगस्ट सोमवारी रोजी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली व त्यानंतर ही घोषणा केली. पंरतू दोन्ही पक्षात जागावाटप निश्चित करण्यात आलेले नाही.
२०१९ मध्ये निवडणुकीपूर्वी ऑल झारखंड स्टुडंट्स यूनियन भाजपापासून वेगळे झाले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांना त्याचा फटका बसला होता. त्यावेळी निवडणूकीत भाजपचे २८ व आजसूचे २ जागा जिंकून आल्या होत्या. झारखंडमध्ये कुर्मी मतदारांची निर्णायक भूमिका आहे.
त्यामुळे सर्व पक्षांनी कुर्मींवर लक्ष केंद्रित केले आहे. अशा परिस्थितीत भाजपने आजसूसोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या डिसेंबर महिन्यांत झारखंडमध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.