सिंधदूर्ग-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा कोसळला आहे. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा ३५ फुटांचा होता. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणमधील तारकर्लीच्या समुद्रकिनारी नौदल दिनाच्या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झाले होते.
“शिवाची महाराजांचा पुतळा हा निकृष्ट कामामुळे कोसळला आहे. याबद्दल आम्हाला दु:ख होत असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. सहा महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा उभरण्यात आला होता” असे स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे. वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही, पण सहा महिन्यांपूर्वी येथील काम ढासळले होते. या प्रकरणी दोषींवर गुन्हे झाले पाहिजे अन्यथा आम्ही जिल्ह्यात नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल. तसेच सर्व शिवप्रेमींनी शांततेत आंदोलन करावे. असे आमदार आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे.