अजित पवारांच्या आमदाराने घेतली शरद पवारांची भेट

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठे बदल होताना दिसत आहेत. अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तूळांत खळबळ उडाली आहे.

शरद पवार हे सध्या उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुका दौऱ्यावर आहेत. यावेळी नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रावर आमदार अतुल बेनके यांनी त्यांची भेट घेतली. अतुल बेनके यांनी जर शरद पवार गटात प्रवेश केला तर अजित पवारांसाठी हा एक मोठा धक्का असू शकतो.

अतुल बेनके यांनी या आधी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची देखील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. अमोल कोल्हे व शरद पवार यांच्या भेटीनंतर अतुल बेनके यांनी मोठे विधान केले होते. राजकारणात काहीही घडू शकते. अगदी शरद पवार आणि अजित पवारही एकत्र येऊ शकतात. त्यामुळे पुढे काहीही घडू शकते, असे आमदार अतुल बेनके यांनी म्हणले होते.

Protected Content