थलपती विजय यांनी केले स्वत:च्या पक्षाचे ध्वजाचे अनावरण

चेन्नई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकप्रिय तमिळ चित्रपट अभिनेते-राजकारणी विजय यांनी गुरुवारी त्यांच्या राजकीय पक्ष तमिझागा वेत्री कळघमचा ध्वज जारी केला. विजय यांनी पनयुर येथील त्यांच्या पक्षाच्या मुख्यालयात या ध्वजाचे उद्धाटन केले. हा ध्वज दोन रंगांचा आहे, त्याच्या वर आणि खालच्या बाजूस लाल रंग आणि मध्यभागी पिवळा रंग आहे, ज्याच्या मध्यभागी लाल रंगाचे वर्तुळ असून त्याच्या दोन्ही बाजूला दोन हत्ती आहेत.

ध्वजाचे अनावरण आणि पक्षगीताच्या अधिकृत प्रकाशनासह टीव्हीके तामिळनाडूच्या राजकारणात एका नवीन अध्यायाची सुरु करण्यास सज्ज झाला आहे. राज्यात आगामी 2026 च्या विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी पक्ष तयारी करत आहे. तामिळ अभिनेते विजय यांनी पक्ष ध्वजाच्या उद्धाटन प्रसंगी सांगितले की, ‘माझा पक्ष सामाजिक न्यायाचा मार्ग अवलंबणार आहे.’ पक्षाचा झेंडा वरच्या बाजूला लाल आणि तळाशी लाल रंगाचा आहे. त्याच वेळी, मध्यभागी पिवळा रंग असून त्यावर दोन हत्ती आणि एक वाघाईचे फूल बनवले आहे, जे विजयाचे प्रतीक आहे. टीव्हीकेने पक्षाच्या सोशल मीडिया हँडलवर ध्वजगीत देखील लाँच केले.

Protected Content