कर्जोद शिवारात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील कर्जोद शिवारात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनलाल प्रजापती यांच्या कर्जोद येथील शेती गट नं. २९० मधील शेताजवळील नाल्यात, अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील, ५ फूट उंचीचा, सावळ्या रंगाचा, उजव्या पायात काळ्या रंगाची चप्पल, कमरेला काळा करदोडा, मेहंदी रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट परिधान केलेल्या अनोळखी इसमाचा मृतदेह आज सकाळी पाण्यात तरंगतांना व कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. संतोष प्रजापती यांच्या तक्रारीवरून रावेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.

Protected Content