जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पश्चिम बंगालमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर वर अत्याचार होवून तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. देशभरात त्या घटनेेचे पडसाद उमटत असून आज शनिवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने बंद पाळून निषेध व्यक्त केला.
डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आपातकालीन विभागासमोर वुई वॉण्ट जस्टीस असे फलक घेऊन डॉक्टर्स उभे होते. याप्रसंगी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रशांत सोळंके, वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रेमचंद पंडित, डॉ.सुभाष बडगुजर, फिजीशियन डॉ.सी.डी.सारंग, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरुड यांच्यासह निवासी डॉक्टर येथे उपस्थीत होते. दंडावर काळी फीत बांधून तीव्र शब्दात निषधे व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी काही नवतरुण डॉक्टरांनी देखील या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत घटनेच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थीत केले. इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेल्या आवाहनाला डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाने पाठिंबा दिला असून केवळ इमरजन्सी सेवा येथे रुग्णांना देण्यात आली.