‘या’ राज्यातील नागरिकांना मिळणार ५० लाखापर्यंत बिनाव्याजी कर्ज

अइज़ोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशभरात आज ७८ व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आहे. या निमित्त मिझोराम सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी गुरुवारी म्हटले की, राज्य सरकार लोकांच्या आर्थिक उन्नती आणि जीवनमानात सुधार करण्यासाठी ५० लाखापर्यंतचे बिनाव्याज कर्ज देण्याची योजना सुरू करणार आहे.

 

७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी म्हटले की, आमचे सरकार सर्वसमावेशक आहे. त्याचबरोबर राज्याचा विकास व सरकारी योजना पारदर्शीपणे तसेच जबाबदारीने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सत्ता मिळाल्यानंतर झोरम पीपुल्स मूव्हमेंट सरकारने अनेक लोकोपयोगी योजना सुरू केल्या आहेत.

मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी आपल्या भाषणात म्हटले की, सरकार राज्याच्या विकासासाठी अथक प्रयत्न करत आहे. याच अनुषगाने सरकार मोठे पाऊल उचलणार असून एक योजना सुरू करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी गॅरेंटरचे काम करणार आहे. मिझोराम सरकार गारंटी अधिनियम,२०११ मध्ये सुधारणा करणार आहे. त्यानुसार पात्र लोकांना ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. यामध्ये कर्जावरील व्याज सरकार भरणार आहे.

Protected Content