राज्य सरकार देणार गोंविदांना १० लाख रूपयांचे विमा संरक्षण

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य सरकारने दहीहंडी उत्सवापूर्वी गोविंदांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. गोविंदांसाठी १० लाख रुपयांचे विमा संरक्षण लागू करण्यात आले असून दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे तयार करतांना एखादी दुर्घटना किंवा दुर्घटना घडल्यास किंवा जखमी झालेल्यांना १० लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाणार असल्याचं राज्याच्या क्रीडा विभागाने जाहीर केले आहे. या साठी २४ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. दहीहंडी असोसिएशनने (महाराष्ट्र राज्य) आक्षेप घेतलेला असतानाही महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने राज्यातील सर्व गोविंदांचा विमा उतरविण्याची मोहीम सुरू केली आहे.

सरकारी आदेशानुसार हात किंवा दोन्ही डोळे गमावणाऱ्या गोविंदांना १० लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाणार आहे. राज्यातील ७५ हजार गोविंदांचा विमा उतरवण्याची घोषणा सरकारने केली आहे. दहीहंडीदरम्यान अपघातात गोविंदांचा एक हात, एक पाय किंवा डोळा गमावल्यास त्यांना ५ लाख तर दोन्ही हात, पाय किंवा डोळे गमावणाऱ्यांना १० लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचा लाभ मिळणार असल्याचं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. अपघातात जखमी झालेल्या गोविंदांना उपचारासाठी जास्तीत जास्त एक लाख रुपये मिळू शकणार आहेत.

Protected Content