केंद्राकडून देशातील सर्वाकृष्ट शिक्षण संस्थेची यादी जाहीर

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी 12 ऑगस्ट रोजी बहुप्रतीक्षित नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क रँकिंग्सच्या 9व्या आवृत्तीची घोषणा केली. दरवर्षी प्रसिद्ध होणारी एनआयआरएफ रँकिंग, विविध निकषांवर आधारित भारतातील उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन करून त्यांची क्रमवारी लावते. पुन्हा एकदा आयआयटी मद्रासने एनआयआरएफ रँकिंग 2024 मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. संस्थेने एकूण आणि अभियांत्रिकी या दोन्ही श्रेणींमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. आयआयटी मद्रासने सलग आठव्यांदा अभियांत्रिकी श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

आयआयटी मद्रास खालोखाल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरूने दुसरे स्थान मिळविले, तर आयआयटी बॉम्बे, आयआयटी दिल्ली आणि आयआयटी कानपूर यांनी अनुक्रमे तिसरे, चौथे आणि पाचवे स्थान पटकावले. आयआयटी खरगपूर सहाव्या, एआयआयएमएस दिल्ली सातव्या आणि आयआयटी रुरकी व आयआयटी गुवाहाटी आठव्या आणि नवव्या स्थानावर आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने दहावे स्थान पटकावले आहे.

जामिया मिलिया इस्लामियाने सलग तिसऱ्या वर्षी विद्यापीठ श्रेणीत तिसरा क्रमांक कायम राखला आहे. जामिया हमदर्द हे फार्मसीसाठी सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून उदयास आले आहे. आयआयएम अहमदाबादला भारतातील सर्वोत्कृष्ट बिझनेस स्कूल म्हणून स्थान देण्यात आले आहे. व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी दोन आयआयटी शीर्ष 10 मध्ये आहेत. एम्स दिल्लीने वैद्यकीय अभ्यासासाठी अव्वल स्थान मिळवले आहे, तर आयआयटी रुरकी हे आर्किटेक्चर अभ्यासक्रमांसाठी प्रथम क्रमांकाचे महाविद्यालय म्हणून उदयास आले आहे. नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बेंगळुरू ही सर्वोत्कृष्ट कायदा संस्था ठरली आहे, तर हिंदू कॉलेज, दिल्लीने महाविद्यालय श्रेणीत अव्वल स्थान पटकावले आहे.

Protected Content