भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भडगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भडगाव तालुक्यातील पिचर्डे गावात मोठया भावाने झोपेत असलेल्या लहान भावाच्या डोक्यात कुऱ्हाडने सपासप वार करून त्यांची हत्या केली. विठ्ठल आनंदा पाटील असे ठार झालेल्या भावाचे नाव आहे तर अभिमन आनंदा पाटील असे आरोपी मोठया भावाचे नाव आहे.
मिळालेली माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, पिचर्डे येथे विठ्ठल आनंदा पाटील हे रात्री खळयातील मोकळया जागेत झोपलेले असताना त्यांचा मोठा भाऊ अभिमन आनंदा पाटील यांनी आपल्या लहान भावाचा खून करून ते त्यांच्या घरी गेले. सकाळी लहान भाऊ खळयात गेले तेव्हा त्यांना विठ्ठल आनंदा पाटील मृतव्यवस्थेत आढळले असता त्यांनी लागलीच पोलिस पाटलांना ही माहिती दिली. पोलिस पाटील यांनी भडगाव पोलिस स्टेशनला कळवले व त्यानंतर भडगाव पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास सुरू केल्यानंतर मोठया भावावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आपल्या पध्दतीने मोठया भावाला जाब विचारल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला.
विठ्ठल आनंदा पाटील यांचा पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. भडगाव पोलिसांनी रुग्णवाहीकेसह घटनेस्थळी धाव घेत खून प्रकरणात वापरलेले हत्यार व आरोपीस देखील ताब्यात घेतले असून, मृतदेहास भडगाव ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले आहे, यावेळी पोलिस उपअधीक्षक अभयसिंग देशमुख यांनी भेट दिली. पोलिस निरीक्षक पवार उपस्थित होते. या घटनेचा पुढील तपास पीएसआय डोमाळे यांच्या नेतृत्वात भडगाव पोलीस करीत आहेत.