Home क्राईम बिहारमधील बाबा सिद्धनाथ मंदिरात चेंगराचेगरी; सात भाविकांचा मृत्यू

बिहारमधील बाबा सिद्धनाथ मंदिरात चेंगराचेगरी; सात भाविकांचा मृत्यू


जहानाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातील बाबा सिद्धनाथ मंदिरात रविवारी रात्री उशिरा चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला, तर ३५ जण जखमी झाले. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये बहुतांश कावडियांचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी अलंकृता पांडे यांनी पीटीआयला सांगितले की, प्रथमदर्शनी असे दिसते की कावडियांमध्ये कशावरून तरी वाद झाला होता. त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची आणि हाणामारी झाली. ज्यामुळे मंदिरात चेंगराचेंगरी झाली. पांडे यांनी सांगितले की, ही घटना रविवारी रात्री उशिरा रात्री 11.30 च्या सुमारास घडली.


Protected Content

Play sound