Home Cities भडगाव वडजी येथील पाटील विद्यालयात गुणवंतांचा सत्कार

वडजी येथील पाटील विद्यालयात गुणवंतांचा सत्कार

0
70
vadji students satkar

vadji students satkar

पाचोरा प्रतिनिधी । वडजी येथील टी.आर. विद्यालयात तुषार थोरात व हर्षीता हिरे या दोन विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

वडजी ता.भडगाव येथील टी.आर.पाटील विद्यालयाचे विद्यार्थी तुषार थोरात याने काव्यधारा मंडळ धुळे आयोजित भिमगीते राज्यस्तरीय काव्यसंमेलनात उत्कृष्ट गितगायन केल्याने त्याला सन्मानित करण्यात आले आहे. तसेच निसर्ग मित्र समिती धुळे आयोजित राज्यस्तरीय चित्रकला रंगभरण स्पर्थेत कु.हर्षिता भाऊसाहेब हिरे या विद्यार्थिनीने उत्कृष्ट चित्रकलेचे सादर केली आहे. यामुळे या दोन्ही गुणवंतांचे संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील यांनी कौतुक केले आहे. तरविद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.पाटील,जेष्ठ शिक्षक बी.वाय.पाटील, एस.जे.पाटील यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी त्यांचा सत्कार केला.


Protected Content

Play sound