विद्यापीठात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत प्रस्ताव मागविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक, शेतकरी सहाय्यता आणि ज्ञान विस्तार अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी नोंदणीकृत व मान्यताप्राप्त संस्था, शाळा, महाविद्यालये यांच्याकडुन प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. तसेच कौशल्याधिष्ठीत आणि रोजगाराभिमूख असे विविध प्रमाणपत्र, पदविका शिक्षणक्रम सुरु करण्याबाबतही प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

अनौपचारिक शिक्षणासोबत समाजपयोगी उपक्रम, पुरक कार्यक्रम आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने राबविले जातात. विद्यापीठ हे समाजातील-शिक्षणऱ्प्रशिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे. या विभागाच्या वतीने विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालये,तसेच सामाजिक संस्था यांना हे उपक्रम राबविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या विभागामार्फत जवळपास ४० विस्तारीत कार्यक्रम राबविले जातात. योग्य त्या प्रस्तावास कार्यक्रमाचे स्वरुप बघुन अनुदान देण्यात येईल. तरी अधिक माहितीसाठी विभागाच्या ०२५७ – २२५७४१५/४१६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संचालक प्रा.आशुतोष पाटील यांनी केले आहे.

Protected Content