Home Cities अमळनेर गांधलीपूरा भागातून तरूणाची दुचाकी लांबविली

गांधलीपूरा भागातून तरूणाची दुचाकी लांबविली

0
104

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील गांधलीपूरा भागातून एका तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १७ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी बुधवारी ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन भिका धिवर वय २४ रा. खाचणे ता.चोपडा हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १७ जुलै रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास सचिन हा दुचाकी क्रमांक एमएच १९ एटी ६६०७ ने अमळनेर शहरातील गांधलीपूरा भागात आलेला होता. त्यावेळी त्याने दुचाकी याच परिसरात पार्कींगला लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर बुधवारी ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता त्याने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद सोनवणे हे करीत आहे


Protected Content

Play sound