राज्यसभेत सभापतींनी अचानक खूर्ची सोडली; भावूकही झाले

दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आज गुरुवारी ८ ऑगस्ट रोजी सभागृहात चांगलेच भावुक झाले होते. त्यांना इतके हळवे यापूर्वी कुणी पाहिले नव्हते. राज्यसभेत विरोधी पक्षांचा गोंधळ सुरु होता.सभापतींनी संतप्त खासदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही विरोधक शांत झाले नाहीत. ते पाहून सभापतींनी रागाने पहिल्यांदा खुर्ची सोडली. त्यानंतर त्यानंतर त्यांनी सभागृहाला संबोधन केले, त्यावेळी ते चांगलेच भावुक झाले होते.

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमधील फायनलपूर्वी अपात्र जाहीर करण्यात आलं. या प्रकरणाचे पडसाद राज्यसभेत उमटले. राज्यसभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी या विषयावर गोंधळ सुरु केला. सभापतींनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही विरोधकांचे समाधन झाले नाही. विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न करताना धनखड चांगलेच भावुक झाले.

विनेश फोगाटसोबत संपूर्ण देश उभा आहे, या प्रकरणात जे शक्य होतं ते सर्व केंद्र सरकारने केले आहे, असं केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी यावेळी सांगितलं. सभागृहातील कामकाजाच्या दरम्यान विरोधी पक्षाकडून सभापतीला दिली जाणारी वागणूक हा काळजीचा विषय आहे. या विषयावर विरोधी पक्षांनी आत्मचिंतन करावं,’ असं नड्डा यावेळी म्हणाले.

Protected Content