Home क्राईम ट्रॅक्टरच्या बॅटरी चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक; रावेर पोलिसांची कारवाई

ट्रॅक्टरच्या बॅटरी चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक; रावेर पोलिसांची कारवाई


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर पोलिस स्टेशनच्या हद्दीतून तेरा हजार रुपये किमतीच्या ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या दोन आरोपींना रावेर पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे ट्रॅक्टर मालकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.

या बाबत वृत्त असे की, शहरातील डी एम हॉलच्या मागे उर्दू शाळेजवळ इकबाल खान (वय ४०, व्यवसाय ट्रॅक्टर चालक, रा. मदिना कॉलनी) यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. याबाबत रावेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत गोपनीय माहिती मिळवून, शहरातील नागझीरी परिसरात गुप्त बातमीदार शोध घेतला असता आरोपी मुस्तकीम खान मन्नान खान (वय २०, रा. नागझीरी रसलपुर रोड, ता. रावेर) आणि दुसरा आरोपी अमिर खान युनुस खान (वय २३, रा. रसलपुर ग्रामपंचायत समोर, ता. रावेर, जि. जळगाव) यांना ताब्यात घेऊन रावेर पोलिस स्टेशनमध्ये आणले.

आरोपींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तेरा हजार रुपयांच्या तीन बॅटऱ्या हस्तगत करण्यात आल्या. सदर गुन्ह्याचा उकल पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलिस अधिक्षक अन्नपूर्णा सिंह, पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ रविंद्र वंजारी, पोकाँ सचिन घुगे, पोकों/ विशाल पाटील, पोकाँ/ प्रमोद पाटील, पोकों/ विकार शेख, पोकॉ/ अमोल जाधव, पोकाँ महेश मोगरे यांच्या पथकाने कार्यवाई केली आहे.


Protected Content

Play sound