सनातन धर्मावर संकटे आली तरी धर्मला सोडू नका – प.पू. श्री विष्णुजी महाराज

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य संतांचे आहे आणि सनातन धर्म कधीही न संपणारा आहे. कितीही संकटे आली तरी धर्म सोडून पळू नका. धर्माच्या मार्गावर चालणारे सर्व धर्मरक्षक असून, परमेश्वराच्या छत्राखाली राहणाऱ्यांचे कधीही वाईट होत नाही, असे प्रतिपादन प.पू. श्री विष्णुजी महाराज (बापूजी) यांनी केले.

वाघोड येथील नागेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बापूजी बोलत होते. यावेळी प.पू. परमानंद महाराज देखील उपस्थित होते. पुढे बोलताना बापूजी म्हणाले की, युवकांनी व्यसनांपासून सावधान राहावे. गौ-तस्करी थांबविण्यासाठी युवकांनी काम करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी गोपाळ चौरामुले, प्रदिप महाजन, सुनील पाटील, सुनिल चौधरी, प्रकाश महाजन, सदाशिव चौरामुले यांनी परिश्रम घेतले. वाघोड येथे काल महारुद्र अभिषेक आणि भंडाराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Protected Content