धनंजय चौधरींनी घेतले ओंकारेश्वर महादेव मंदिराचे दर्शन

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तामसवाडी येथिल श्री. क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिर येथे प्रथम श्रावण मासारंभानिमित्त दर्शन घेउन मंदिरात आरती धनंजयभाऊ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आली. कृतज्ञता संवाद यात्रे निमित्त भोर, तामसवाडी या गावांना मा. धनंजयभाऊ चौधरी यांनी भेट दिली. त्याप्रसंगी मंदिराचे पुजारी मुकेश सुखदेव भरणे महाराज, योगेश सोपान पाटील, उप सभापती योगेश पाटील,रतन पाटील , जिजाबराव पाटील,संतोष पाटील, मुकेश पाटील,दत्तात्रय पाटील,काशिनाथ महाजन इतर सर्व गाव मंडळी उपस्थित होते.दरवर्षीप्रमाणे कावड यात्रा खानापुर ते श्री. क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिर येथे पोहचली. त्या कावड यात्रेचे स्वागत मा. धनंजयभाऊ चौधरी यांनी केले व प्रथम श्रावणमासारंभानिमित्त मंदिरामध्ये आलेल्या सर्व भाविकांना व कावड यात्रेतील सहभागी यांना प्रसाद म्हणून फराळाचे वाटप केले. याप्रसंगी ग्रामसेवक निलेश घुले, सरपंच धनराज पाटील ह्यांच्या हस्ते पुष्गुच्छ आणि शाल देऊन धनंजय चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.

शासनाचे निष्क्रिय यंत्र व यंत्रणेमुळे गोरगरीबांना ऐन पावसाळ्यात शिधावाटप करण्यात वारंवार तांत्रिक अडचणी असतात. यासाठी शासनयंत्रणेच्या विरो़धात रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने अंत्ययात्रा काढून आमदार शिरीष दादा चौधरी व धनंजयभाऊ यांच्या उपस्थितीत मा.तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तामसवाडी व भोर येथिल बचत गटातील महिलांना नवनवीन उद्योग धंदे कसे करता येतील ? महिला सशक्तीकरण करण्यासाठी महिला स्वयम् रोजगार शेळी पालन, चिप्स बनवणे, शिवण काम अशा अनेक प्रकारच्या व्यवसायामधून रोजगार कसा उपलब्ध होईल? तसेच शेतकरी बाधवांना रोजगार आणि शिक्षण यांच्या संबंधित माहिती धनंजय चौधरी यांनी मोठ्या संख्येने जमलेल्या महिलांना दिली. डॉ. लता मोरे, अध्यक्षा अलका पाटील ,भाग्यश्री पाटील, रश्मी साळी ,रुपाली परदेशी यांनी याबाबत प्रशिक्षण दिले.

याप्रसंगी गावातील सरपंच चित्रा बबलू मोरे, नंदा आनंद बाविस्कर ,तसेच बचत गटाच्या अध्यक्ष संगिताबई सांगळे,अनिता घोरपडे, शीतल सांगळे, सचिव मनीषा सांगळे व इतर महिला सदास्या उपस्थित होते. सरपंच विमलबाई धनराज पाटील , धनराज पाटील यांनी जि.प. शाळेतील मुले- मुलींना बस सुविधा पुरेशी नसल्याची समस्या मांडली. तसेच भोर येथिल पाण्याच्या टाकीची व सांडपाण्याची समस्या मांडली. त्यावर धनंजय चौधरी यांनी तात्काळ रावेर बस डेपो येथे संपर्क करून सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.वीज डीपीबाबत धनंजयभाऊंनी मागोवा घेतला असता मंजूरी प्रलंबित असल्याची माहिती मिळाली. ग्रामसेवक निलेश घुले तसेच जि. प. शेळेचे मुख्याध्यापक संजय तडवी,भूषण गवारे, मोर गावातील अंगणवाडी येथे धनंजय चौधरींनी अनिता घोरपडे, राकेश घोरपडे,सागर घेमळ, व गावकरी यांच्याशी चर्चा केली.

सरपंच धनराज पाटील, विमलबाई धनराज पाटील ह्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. धनंजय चौधरी यांनी गावात स्वतः फिरून गावातील समस्या जाणून घेतल्या, गावातील नागरिकां सोबत समस्याचे निराकरण करण्या संबंधित चर्चा केली.यावेळी मधुकर नेमाडे,धनराज पाटील,जिजाबराव पाटील,किशोर तायडे, सरपंच चित्रा मोरे, पुष्पा घेमळ, ग्रामसेवक घनेश पाटील, कॉन्ट्रॅक्टर देव गायकवाड ह्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. त्याप्रसंगी समस्त गाव मंडळी उपस्थित होते.

Protected Content