बारामतीत अजित पवारांनी मागितले सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीतील पराभव राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यात, बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभव पत्कारावा लागल्याने अजित पवारांवर नामुष्कीची वेळ आली. त्यानंतर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आज अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर असून त्यांनी येथील पदाधिकाऱ्यांना दम भरला आहे.

लोकसभेत जे झाले ते झाले. आता मला काही बदल करायचा आहे. तुम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे राजीनामा द्या, त्यानंतर मी काही निर्णय घेतो, असेही दादा म्हणाले. शरद पवार यांचे होम ग्राऊंड असलेल्या बारामतीतल्या वृंदावन गार्डन येथे कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, शहर, ग्रामीण, महिला, सगळ्या सेलच्या लोकांनी सगळ्यांनी मला राजीनामे द्यावेत, मी पुढं बघू काय करायचे ते. लोकं म्हणतात त्यात तेल ओतण्याचे काम केलं, आपल्या स्टेजवर बसायचं आणि मागे वेगळं बोलायचं. माझं काटेवाडी प्लस मध्ये गेलं म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे, असेही अजित पवारांनी कार्यकर्ता मेळाव्यात सुनावले.

Protected Content