बांग्लादेशात पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर सैन्य अंतरिम सरकार स्थापन करणार

ढाका-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बांगलादेशातील आरक्षणविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी ५ ऑगस्ट रोजी राजीनामा दिला. लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांनी ढाका येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, आता लष्कर अंतरिम सरकार स्थापन करेल.दुसरीकडे, ढाकामध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. लष्करप्रमुखांनी लोकांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणू. श्रद्धा ठेवा.

सुमारे 4 लाख लोक रस्त्यावर उतरले आहेत. राजधानीत ठिकठिकाणी हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटना घडत आहेत. पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान निवासस्थान सोडले आहे. वृत्तसंस्था एएफपीने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, पंतप्रधान ढाका सोडून काही सुरक्षित ठिकाणी गेल्या आहेत. त्यांची बहीण रेहानाही त्यांच्यासोबत आहे. त्याचवेळी, हसीना लष्करी हेलिकॉप्टरने भारतात पोहोचल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. त्या पश्चिम बंगालमध्ये असल्याची बातमी आहे. मात्र याची पुष्टी होऊ शकली नाही. हसीना देश सोडून जाण्याबाबत लष्करप्रमुख काहीही बोललेले नाहीत. बांगलादेशी वृत्तपत्र प्रथम आलोच्या मते, अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली आहे. यामध्ये 6 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आंदोलकांनी तंगेल आणि ढाक्यातील एक प्रमुख महामार्ग ताब्यात घेतला आहे.

Protected Content