अवैधपणे गुरांची वाहतूक करणारे वाहन पकडले; तीन जणांवर गुन्हा दाखल

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव पेठ परिसरातून अवैधपणे गुरांची वाहतूक करणारे वाहन भडगाव पोलीसांनी पकडले आहे. या कारवाईत पोलीसांनी ६ बैल व १० गोऱ्ह्यांची सुटका केली आहे. पोलीसांनी वाहन जप्त केले असून भडगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव शहरातील भडगाव पेठ परिसरातून बोलेरो पिकअप वाहन क्रमांक (एमच १९ बीएम ३०४४) मधून अवैधपणे गुरांची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती भडगाव पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी कारवाई करत शनिवारी ३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता कारवाई करत वाहन पकडले. या वाहनातून ६ बैल व १० गोऱ्हे यांची निदर्यपणे कोंबून वाहतूक करतांना मिळून आले. पोलीसांनी वाहन जप्त केले असुन गुरांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी पो.कॉ. प्रविण परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी चालक इम्रान अली तलीब अली सैय्यद वय ३० रा कासोदा, मालक सादीक खान उस्मान खान रा धरणगाव आणि शेख शहजाद शेख नईम रा. कासोदा या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार इकबाल शेख हे करीत आहे.

Protected Content